• (+91) 8806580307
  • contact@vidyabhartikokan-mumbai.org

Follow Us :

  • Home
  • ABOUT US
  • Our Dimentions
    • Our Fundamental Dimentions
      • Shishuvatika
      • Teachers Training
      • Parents Training
      • Envoirmental Education
      • National Education
    • Our Basic Education
      • Physical Education
      • Yoga Education
      • Ethics & Spirtual Education
      • Sanskrit Education
      • Music Education
  • Events
  • Gallery
  • Kriyakalap
  • E-Book
  • Our Team
  • CONTACT
  • HOME
  • ABOUT US
  • Our Dimentions
    • Fundamental Dimentions
      • Shishuvatika
      • Teachers Training
      • Parents Training
      • Envoirmental Education
      • National Education
    • Basic Education>
      • Physical Education
      • Yoga Education
      • Ethics & Spirtual Education
      • Sanskrit Education
      • Music Education
  • Events
  • Gallery
  • Kriyakalap
  • E-Book
  • Our Team
  • CONTACT

Project

  • Home
  • Our Up-Coming Projects


Our Up-Coming Projects


विद्याभारती ही सन १९५२ पासून अखिल भारतीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना आहे. शिशुवाटिका, प्राथमिक व माध्यमिक विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये, एक शिक्षकी विद्यालये आणि संस्कार केंद्रे यांचाही समावेश होतो. भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित परंतु आधुनिकतेचा ध्यास असलेली शिक्षण व्यवस्था तसेच शिक्षणातील सुयोग्य नमुना देण्यासाठी ‘शिशुवाटिका, समग्र विकास व पंचकोषाधारित गुरुकुल’ असे प्रयोग विद्याभारती द्वारे यशस्वी होत आहेत.
केंद्र शासनाने घोषित केलेल्या व कार्यान्वित होणार्‍या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील अनेक बाबी विद्याभारती प्रारंभापासूनच यशस्वीरित्या राबवत आहे. शाळांच्या जोडीला प्रशिक्षण व संशोधन केंद्र, कौशल्य विकास केंद्र, क्रीडा केंद्र, वेदाध्ययन केंद्र, योग व संस्कृत केंद्र, पर्यावरणयुक्त व आयुर्वेदिक बाग, कृषी विकास, गोशाळा या सर्व गोष्टींनी युक्त असे महाराष्ट्रातील पहिले विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल ( प्रकल्प ) रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आकारास येत आहे.




महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिशुवाटिका असल्या तरी संपूर्ण शिक्षण प्रकल्प राबविणारे अशा तर्‍हेचे पहिले संकुल १६.५ एकर जागेवर मौजे – शिरळ, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे उभारले जात आहे. चिपळूणपासून ७.५ कि.मी. अंतरावर शिरळ येथे विद्याभारतीचा शैक्षणिक प्रकल्प साकार होत आहे.
विद्याभारती कोंकण प्रांत व पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांद्वारे सदर प्रकल्पनिर्मिती होत आहे. या प्रवासात प्रगत समाज घडविण्यासाठी शिक्षण ही काळाची गरज आहे हे ओळखून संस्थेचे शैक्षणिक कार्य पुढे नेण्यासाठी आपल्यासारख्यांचे अनेक हात एकवटतं आहेत. प्रकल्पाचा विस्तार अधिक नियोजनपूर्वक व निश्चित दिशेने होऊन एक ‘आदर्श प्रशाला’ म्हणून रमणीय, निसर्गरम्य परिसरात बहरलेली, विद्यार्थी केंद्रित अद्ययावत शाळा बनविण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेने आखलेल्या ‘मिशन’ ला पूर्ण स्वरूप देऊन महाराष्ट्रातील एक नामांकित संस्था व प्रशाला म्हणून नावारुपास आणणे हाच ध्यास आहे.




संस्थेचे उद्दिष्ट सजग, संवेदनशील, विविध अत्यावश्यक कौशल्ये आत्मसात केलेला व देशाप्रती समर्पण भाव असलेला उत्तम नागरिक घडवणे हे आहे. यासाठी विद्यार्थी शिक्षण (शिशुवाटीका), शिक्षक प्रशिक्षण, पालक प्रबोधन यावर काम केले जात आहे. विद्याभारतीचे शिक्षणातील आधारभूत घटक संस्कृत, संगीत, योग, क्रीडा व मूल्यशिक्षण हे आहेत. शिक्षणात याचा समावेश केला जातो. मातृभाषेतून विद्यार्थी केंद्रित, कृतीयुक्त व आनंददायी शिक्षण दिले जात आहे. आदर्श शिशुवाटिका, आदर्श शाळा ज्यात पहिली ते चौथी समग्र विकास, पाचवी ते दहावी पंचकोषाधारीत गुरुकुल असणार आहे. याशिवाय भव्य क्रीडांगण, ऑडिटोरियम, योग केंद्र, कौन्सिलिंग सेंटर, प्रशिक्षण व संशोधन केंद्र व कौशल्य विकास केंद्र इ. गोष्टी असणार आहेत. संस्थेचा प्रागतिक व विशुद्ध शैक्षणिक दृष्टिकोन, संस्थेस लाभलेला लोकाश्रय तथा समाजातील दानशूर शिक्षणप्रेमींच्या योगदानातून संस्थेने पाहिलेले हे स्वप्न निश्चितच साकारेल असा सार्थ विश्वास आहे.



विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल समिती चिपळूण ( प्रकल्प समिती ) कार्यकारी मंडळ


क्र.

नाव

पदनाम

१

एयर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत

अध्यक्ष

२

श्री. श्रेयस श्रीधर थत्ते

उपाध्यक्ष

३

सौ. छाया शरद मुसळे

कार्यवाह

४

डॉ. सौ. अश्विनी तेजानंद गणपत्ये

सहकार्यवाह

५

श्री. माधव वसंत परांजपे

कोषाध्यक्ष

६

श्री. अतुल प्रसन्न निफाडकर

सहकोषाध्यक्ष

७

श्री. सुमेध श्रीकांत करमरकर (सी.ए.)

सदस्य

८

श्री. संतोष बाळासाहेब भणगे

सदस्य

९

श्री. मोहन दत्तात्रेय कुलकर्णी

सदस्य

१०

श्री. सदाशिव सीताराम उपाले

कायम निमंत्रित



About Us

विद्याभारती ही सन १९५२ पासून अखिल भारतीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी सर्वांत मोठी स्वयंसेवी संघटना आहे. देशभरात विद्याभारतीची सुमारे २४००० विद्यालये असून त्यांतून सुमारे १० लक्ष विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही विद्यालये लडाखपासून केरळपर्यंत जाणि गुजरातपासून अरुणाचलपर्यंत पसरलेली आहेत.सदर विद्याभारती कोकण- मुंबई संस्थेची सुरवात २००६ साली मुंबई येथे झाली श्री पराडकर हे संस्थेचे विद्यमान अध्यक्षपद भूषवत आहेत यामध्ये शिशुवाटिका, प्राथमिक माध्यमिक विद्यालये, एक शिक्षकी विद्यालये आणि संस्कार केंद्रे यांचा समावेश होतो.

Quick Links

  • Home
  • About us
  • Events
  • Kriyakalap
  • Our Team
  • E-Book

Contact Us

Copyrights © 2021 VidyaBharti Kokan-Mumbai.Designed By NK Media Solutions