About-us
आजच्या जागतिकीकरणाच्या युगात सामाजिक परिस्थिती बदलत चालली आहे. आपण सारे आधुनिकतेच्या मागे धावत आहोत. त्यामुळे आपले जीवन विषयक तत्वज्ञान बदलत आहे, तसेच शिक्षण क्षेत्रात नवनव्या संकल्पना आल्यामुळे शिक्षणाची परिभाषाही आता बदलू लागली आहे.
खरेतर शिक्षण म्हणजे माणसाला सुसंस्कारित करून उत्तम व सुजाण जागरिक घडविण्याची व्यवस्था होय. पण ही बाब हळूहळू नष्ट होत चालली आहे. अशा या बदलत्या परिस्थितीसुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा, शिक्षण संस्था यांच्यापुढे समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. त्या लक्षात घेऊन शिक्षण विषयक जेमके धोरण ठरविले पाहिजे, अशी आवश्यकता निर्माण झाली आहे.
औपचारिक शिक्षणाबरोबर आनंददायी अनौपचारिक शिक्षण कशाप्रकारे देता येईल, याचा विचार करून, त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण व पालकांचे (समाजाचे) प्रबोधन झाले पाहिजे. तरच उत्तम व सुजाण नागरिक घडविण्याचे काम होऊ शकेल. म्हणूनच आधुनिकता सांभाळत भारतीय संस्कृती (Cultural Ratio Index) जोपासण्यासाठी भारतीय शिक्षण प्रणालीच्या आधारे आपणा सर्वांसाठी हे काम 'विद्याभारती करीत असते.